किटलमध्येच डिफेन्स एक्स्पो

0
91

>> सरकारची संरक्षणमंत्रालयास तत्वत: मान्यता

केपें तालुक्यातील किटल येथे ‘डिफेन्स एक्स्पो’चे २०१८ साली आयोजन करण्यासाठी गोवा सरकारने संरक्षण मंत्रालयाला तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२०१६ साली किटल येथे डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री असताना किटल येथे या डिफेन्स एक्स्पोचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी किटल येथील जमीन डिफेन्स एक्स्पोसाठी देण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता. मात्र सर्व विरोध धुडकावून लावून गोवा सरकारने संरक्षण मंत्रालयाला तेथे डिफेन्स एक्स्पो भरवण्यास पूर्ण सहकार्य केल्याने सदर ठिकाणी डिफिन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर पुढील वर्षी सदर ठिकाणी डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यास राज्य सरकारने संरक्षण मंत्रालयाला तत्त्वत: मान्यता दिली असल्याने सदर ठिकाणी दुसर्‍यांदा डिफेन्स एक्स्पो होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.