‘सागर डिस्कोर्स’ २०१७ आंतरराष्ट्रीय परिषदेस गोव्यात उद्यापासून प्रारंभ

0
108

>> २१ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग

‘सागर’ डिस्कोर्स २०१७ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान गोव्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत २१ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला सागर म्हणजेच समुद्र यावर या परिषदेचा खास भर असणार आहे, अशी माहिती शेकटकर यांनी दिली. या परिषदेत हवामान बदल, व्यापार आणि वाणिज्य व अन्य महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे इंटिग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी या फोरमद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने एक सागरी धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समुद्राची वाढती पातळी तसेच समुद्राशी संबंधीत अन्य काही मुद्यांवरही चर्चा होणार आहे. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय विदेश व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सुरेश प्रभू, गजेंद्र शेखावत, नौदल प्रमुख सुनील लानबा, निवृत्त नौदल प्रमुख आर. के. धोवन आदी उपस्थित राहणार आहेत.