जागतिक कामगार दिनी काल गोवा सरकारने कामगारांच्या कल्याणासंबंधीच्या नव्या योजनांचा शुभारंभ केला. या योजनांमध्ये कामगारांसाठी डिजिटल साक्षरता कार्यक्रम, त्यांच्या वृद्ध पालकांसाठी वैद्यकीय सहाय्य, कामगारांच्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षा व कोचिंगसाठी आर्थिक मदत, तसेच उच्च शिक्षणासाठीच्या ट्युशन फीचे पैस परत देण्याची योजना, तसेच पंतप्रधान सुरक्षा विमा योजना आदींचा समावेश आहे. राज्यभरातील 1 लाख 40 हजार कामगारांना वरील योजनांचा लाभ मिळेल.