Home बातम्या इफ्फी संचालकपदीगोवारीकरांची नियुक्ती

इफ्फी संचालकपदीगोवारीकरांची नियुक्ती

0

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता आशुतोष गोवारीकर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) संचालकपदी नियुक्ती केली आहे. नोव्हेंबर 2026 ला गोव्यात होणाऱ्या इफ्फीचे संचालक म्हणून ते सूत्रे हाती घेणार आहेत. ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘जोधा अकबर’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक असलेले आशुतोष गोवारीकर हे इफ्फीचे मावळते संचालक व चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याकडून इफ्फीची सूत्रे हाती घेतील. इफ्फीच्या संचालकपदी झालेल्या नियुक्तीविषयी बोलताना गोवारीकर हे म्हणाले की, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे. दरम्यान, गोवारीकर हे 2024 साली इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागासाठीचे ज्युरी अध्यक्ष होते.