काकोडा नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाची नोटीस संचालकांनी फेटाळली

0
174

नगरपालिका संचालकांनी काकोडा कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडारकर यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाची नोटीस फेटाळून लावली आहे.
काकोडा कुडचडे पालिकेच्या नगराध्यक्षपदी होडारकर यांची निवड झाल्यानंतर राजकीय पातळीवर खळबळ उडाली होती. होडारकर यांच्या विरोधात केवळ अर्ध्या तासात भाजप समर्थक नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून होडारकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. काकोडा कुडचडे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निवडीचा निकाल येण्यापूर्वीच अविश्वास ठराव सादर करण्यात होता. त्यामुळे तो ठराव स्वीकृत केला जाऊ शकत नाही, अशी माहिती नगरपालिका संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी दिली.
अविश्वास ठरावाची नोटीस फेटाळण्यात आल्याने नगराध्यक्ष होडारकर यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. भाजप गटाला आता नव्याने अविश्वास ठरावाची नोटीस द्यावी लागणार आहे.