Home बातम्या सीबीआय चौकशीच्या न्यायालयीन आदेशानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

सीबीआय चौकशीच्या न्यायालयीन आदेशानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

0

सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर वादात सापडलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने काल दिले. त्यानंतर श्री. देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. नवे गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील यांची निवड झाली आहे.
‘‘न्यायालयीन आदेशानंतर ह्या पदावर राहण्याचा आपल्याला नैतिक अधिकार पोहोचत नसल्याने राजीनामा सादर करीत आहोत’’ असे देशमुख यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.