राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभेत पोहोचले. 100 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस, घराणेशाही, भ्रष्टाचार, रोजगार, महागाई, राम मंदिर, पर्यटन, महिला, शेतकरी, युवक, विरोधी आघाडी आणि एनडीए सरकारच्या 10 वर्षांच्या कामगिरीबद्दल चर्चा केली. एकच प्रोडक्ट अनेकवेळा लाँच केल्यामुळे काँग्रेसच्या दुकानाला टाळे लागण्याच्या मार्गावर आहे. देशाबरोबरच काँग्रेसलाही घराणेशाहीचा फटका बसत आहे, असेही मोदी म्हणाले.