कला अकादमी नूतनीकरण चौकशीसाठी समिती स्थापन

0
8

राज्य सरकारने कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या चौकशी करण्यासाठी एका विशेष तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. या समितीला 60 दिवसांत अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये डॉ. आशिष रेगे, संदीप प्रभू चोडणेकर आणि डॉ. के. जी. गुप्ता यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीकडून कला अकादमीच्या नूतनीकरण कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत चौकशी केली जाणार आहे.

या समितीकडून कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाच्या प्रक्रियेचे मूल्यांकन केले जाणार आहे. नूतनीकरण इमारत कामाची पाहणी, कायदेशीर प्रक्रिया आदींबाबत प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

कला अकादमीच्या इमारतीचे सुमारे 50 कोटी रुपये रुपये खर्चून नूतनीकरण केले जात आहे. गेल्या नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप उद्घाटन झालेले नाही. नूतनीकरणासाठी निविदा जाहीर करण्यात न आल्याने चौकशीची मागणी केली जात आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य विधानसभेत सुध्दा कला अकादमीचा विषय लावून धरला आहे. या प्रकरणी दक्षता विभागाने सखोल चौकशीची शिफारस सरकारला केली आहे.