Home Featured कर्नाटकात सोमवारपासून २४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन

कर्नाटकात सोमवारपासून २४ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन

0

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी मोठा निर्णय घेताना १० ते २४ मेपर्यंत कर्नाटकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोमवार दि. १० मे रोजी सकाळी ६ ते दि. २४ मे सकाळी ६ वाजेपर्यंत कोरोना प्रादूर्भावाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटकात संचारबंदी लागू केली होती. मात्र संचारबंदीनंतरही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत कर्नाटकात ४८ हजारांवर बाधित आढळून आले. तर २८ हजारांवर रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र याचवेळी ५९२ जणांनी प्राण गमावले. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १८ लाख ३८ हजार रुप्ण असून ५ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण असल्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितले.