Home Featured इस्पितळांतील प्राणवायू पुरवठ्याची सर्वपक्षीय पाहणी हवी ः कामत

इस्पितळांतील प्राणवायू पुरवठ्याची सर्वपक्षीय पाहणी हवी ः कामत

0

राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून सरकारी कोविड इस्पितळातील प्राणवायू पुरवठ्याची पाहणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली.

राज्यातील कोरोना महामारी व्यवस्थापनाची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. इस्पितळात उपचार घेणार्‍या रुग्णांचे नातेवाईक वरच्यावर दूरध्वनी करून वैद्यकीय प्राणवायूच्या तुटवड्याची तक्रार करीत आहेत. प्राणवायूच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे रुग्ण गुदमरत आहेत. मात्र, राज्य सरकार बेफिकीर आहे. इस्पितळातील वैद्यकीय प्राणवायू पुरवठ्याची शनिवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून पाहणी करण्याची मागणी, विरोधी पक्षनेते कामत यांनी केली.

वैद्यकीय प्राणवायूच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण भाजप सरकारवर राहील, असा इशारा विरोधी पक्षनेते कामत यांनी दिला.

राज्य सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळासमवेत प्राणवायू पुरवठा व इतर सुविधांची पाहणी करण्याची हिंम्मत दाखवावी, असेही कामत यांनी म्हटले आहे.