कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवराज बोम्मई शपथबद्ध

0
55

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा काल बुधवारी सकाळी ११ वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत बोम्मई यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी शपथ दिली. या कार्यक्रमात भाजपचे अनेक केंद्रीय आणि राज्यातील नेते उपस्थित राहिले.

शपथविधीपूर्वी बोम्माई यांनी केंद्रीय भाजप निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेेच माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचीही भेट घेतली. शपथग्रहणानंतर कॅबिनेटची एक बैठक घेणार असून राज्यातील कोविड आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत एक बैठक घेणार असल्याचे बोम्मई यांनी म्हटले आहे. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.