कर्नाटकचे मंत्री जारकीहोली यांचा सीडीप्रकरणी राजीनामा

0
89

कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोली यांनीकाल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जारकीहोली यांनी दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वीकारत तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. जारकीहोली हे कर्नाटकातील गोकाकचे भाजपचे आमदार आहेत. जारकीहोली यांचा एक व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात जारकीहोली हे पदाचा दुरुपयोग करताना एका महिलेसोबत दिसत आहेत. मात्र हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत जारकीहोली यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता.

जारकीहोली यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढली. दिल्लीतून पक्ष नेतृत्त्वाने दिलेल्या सूचना त्यांना कळवण्यात आली. यानंतर जारकीहोली यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण चौकशीत निर्दोष आढळल्यास पुन्हा मंत्रिपद बहाल केले जाईल, या अटीवर जारकीहोली यांनी राजीनामा दिला.