बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

0
87

>> २४ एप्रिल ते १७ मेपर्यंत परीक्षा, १० वीची परीक्षा २० मेपासून

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीच्या परीक्षेला २४ एप्रिलपासून सुरुवात होणार असून १७ मे २०२१ पर्यत चालणार आहे. दहावीची परीक्षा २० मे ते ३ जून दरम्यान घेतली जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.
बारावी आणि दहावीच्या परीक्षेसाठी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार आहे. परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार असून एका वर्गात केवळ १२ ते १५ मुलांना बसण्यास मान्यता दिली जाणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी १९ हजार २४१ मुले बसणार आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी २३ हजार मुले बसणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जास्त परीक्षा केंद्रांची तरतूद करण्यात आली आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबातील मुलांसाठी परीक्षेच्या ठिकाणी वेगळी खास खोलीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बारावीचा निकाल जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.

२४ एप्रिल – इंग्रजी प्रथम भाषा, २७ एप्रिल – एनएसक्यूएफ, २८ एप्रिल – अर्थशास्त्र, ३० एप्रिल – सेक्रेंटेरियल पॅक्टीस, ३ मे – रसायन शास्त्र, बिझनेस स्टडीस्, ४ मे – समाजशास्त्र, ५ मे – बँकिंग, को.-ऑपरेशन, कंम्युटर सायन्स, ६ मे – मानसशास्त्र, ७ मे – अकाउंटन्सी, इतिहास, भौतिकशास्त्र, ८ मे – कोकणी, १० मे – गणित, राज्यशास्त्र, ११ मे – द्वितीय भाषा, १२ मे -हिंदी द्वितीय भाषा , १३ मे – मराठी द्वितीय भाषा, १५ मे – जीवशास्त्र, १७ मे – भूगोल. तसेच, व्यावसायिक शाखेची परीक्षा २६ एप्रिल ते ८ मे २०२१ या काळात घेतली जाणार आहे.