एसआयटी अवहालानंतर खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे

0
134

>> मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना जो कोट्यवधी रु. चा खाण घोटाळा झाला होता ते प्रकरण पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाकडे आहे. मात्र, ते त्यांच्याकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपवावे काय, याचा निर्णय विशेष चौकशी पथक (एसआयटी) त्या संदर्भात काय अहवाल देते त्यानुसार घेण्यात येणार असल्याचे काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

कला अकादमीत काल मोदी ङ्गिस्टचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. खाण घोटाळा प्रकरण तपासकामासाठी सरकार सीबीआयकडे सोपवणार असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकारांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना छेडले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरकारने तसा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. खाण घोटाळ्याची व्याप्ती ही ङ्गार मोठी आहे. त्यामुळे त्याबाबत तडकाङ्गडकी काहीही निर्णय घेणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. या घोटाळ्याची व्याप्ती ही मोठी असल्याने तपासकामही त्यामुळे लांबू शकते, असे सांगून त्यामुळे सध्या एसआयटीकडे असलेले तपासकाम त्यांच्याकडून काढून घेऊन ते सीबीआयच्या हवाली करणे हे शहाणपणाचे ठरणार नसल्याचे ते म्हणाले.
जीएसटीचा सर्वसामान्यांना ङ्गायद्याचा वस्तू व सेवा कराविषयी त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, त्याचा सर्वसामान्य जनतेला ङ्गायदाच होईल. जीएसटीमुळे कर खाली येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जीएसटीविषयी लोकांना जास्त काही माहीत नसल्याने त्याबाबत सुरूवातीच्या काळात त्यांचा गोंधळ उडू शकतो असे बोलले जात आहे असे त्यांच्या नजरेत आणून दिले असता ते म्हणाले की काहीसे गोंधळाचे वातावरण आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र, त्याबाबत कुणी चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याबाबत लोकांना आवश्यक ती माहिती देण्यात येईल व कुणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.