Home बातम्या एमआरएफचा कुडाळातील नोकरभरती मेळावा अखेर रद्द

एमआरएफचा कुडाळातील नोकरभरती मेळावा अखेर रद्द

0

एमआरफच्या गोवास्थित कंपनीने महाराष्ट्रातील कुडाळ (सिंधुदुर्ग) येथे आयोजित केलेली नोकरभरती मेळावा गोव्यातील विरोधी पक्षांच्या दबावामुळे शेवटच्या क्षणी रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष धीरज परब यांनी काल याबाबत स्थानिक पत्रकारांना वरील माहिती दिली. एमआरएफ कंपनीने सदर प्रकरणी त्यांना पाठवलेला ई-मेल परब यांनी काल पत्रकारांना दाखवला.
एमआरएफने आपल्या गोव्यातील कंपनीत काम करण्यासाठी कुडाळ येथे हा नोकरभरती मेळावा घेण्याचे ठरवले होते. गोव्यातील विरोधी पक्षांनी या प्रश्नावरून एमआरएफ कंपनीवर टीका करतानाच गोव्याबाहेरील हा नोकरभरती मेळावा रद्द केला जावा, अशी मागणी लावून धरली होती. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने एमआरएफने कुडाळ येथे नोकरभरती मेळावा आयोजित केल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. तसेच सदर वृत्त हे खोटे असल्याचा दावा केला होता. मात्र, मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब यांनी काल स्थानिक पत्रकारांशी बोलताना सदर वृत्ताला दुजोरा दिला.