Home बातम्या पिळर्ण येथे मुलांसाठी ‘बेक अ ब्राउनी’ कार्यशाळा

पिळर्ण येथे मुलांसाठी ‘बेक अ ब्राउनी’ कार्यशाळा

0

पिळर्ण येथील म्युझियम ऑफ गोवा येथे मुलांसाठी मजेशीर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रविवार 14 सप्टेंबर रोजी ‘बेक अ ब्राउनी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कल्पकता, खाद्यपदार्थ आणि कलेचा सुंदर संगम मुलांना अनुभवायला मिळणार आहे. या कार्यशाळेत लहान शेफ स्वतः स्वयंपाकघरात उतरतील. मिसेस पी यांच्या मार्गदर्शनाखाली मुले स्वतः ब्राउनी तयार करून त्या सजवणार आहेत. शेवटी हलक्या – फुलक्या आर्टने ह्या सत्राची सांगता होईल. दुपारी 4 वाजल्या पासून कार्यशाळा सुरू होईल. नोंदणीसाठी संपर्क : 8010565923.