‘एनआयटी’ चाचणीआधी वैद्यकीय प्रवेश परीक्षा घ्या

0
86

यापुढे सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालय व दंत महाविद्यालयातील प्रवेश चाचणी परीक्षा एनआयटीची चाचणी सुरू होण्यापूर्वी करावी, अशी राज्यातील पालकांची मागणी आहे. एनआयटीसाठी प्रवेश घेतलेले काही विद्यार्थी एनआयटी सोडून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यावर्षी एका विद्यार्थ्याने तसे केल्याने एनआयटीतील एक जागा रिक्त राहिली आहे.
यंदा गोवा शालांत मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल १० मे रोजी झाला त्यानंतर जीसीइटीचा निकाल १२ मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर एनआयटीच्या प्रवेशाची चांचणी सुरू होऊन ती दि. १३ ऑगस्ट रोजी संपली. प्रवेश चाचणीची मदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही तर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी मुदत १३ ऑगस्ट रोजी संपली. एनआयटीच्या प्रवेश चाचणी परीक्षेचा कार्यक्रम यापूर्वीच निश्‍चित झालेला असतो. वैद्यकीय महामंडळाला प्रवेशाची शेवटची फेरी दि. ३० नोव्हेंबर रोजी संपली. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या एनआयटीतील विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेणे शक्य होते. त्यामुळे एनआयटीतील जागा रिक्त होतात. त्याचा फायदा कुणालाही होत नाही. त्यामुळेच वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया एनआयटीच्या प्रवेशाची मुदत संपण्यापूर्वीच पूर्ण करावी, अशी मागणी आहे. वरील प्रकारामुळे स्थानिक विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.