पारदर्शक व्यवहारासाठी केंद्राचा नवा खाण कायदा

0
95

येत्या लोकसभेच्या अधिवेशनात नवे खाण धोरण मांडण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय पोलाद व खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले. विधेयकाचा मसुदा जवळ जवळ नक्की झाला असल्याचे ते म्हणाले. देशातील खाण क्षेत्रासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे या विधेयकात असतील असे त्यांनी सांगितले.
लिजांना मान्यता व खाणींच्या बोलींची प्रक्रिया तसेच एकुण खनिज व्यवहार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी विधेयकात खास प्रयत्न असेल, असे तोमर म्हणाले.