उपराष्ट्रपती हमीद अन्सारी रविवारी गोव्यात

0
79

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी गोवा भेटीवर येत आहेत. त्यासंदर्भात दाबोळी येथील आयएनएस हंसा स्वागत एन्क्लेव आणि राजभवन येथे सुरक्षा व्यवस्थेसंबंधी बैठक झाली. उपराष्ट्रपती दि. २१ रोजी सांयकाळी मंगळूर येथील खास विमानाने गोव्याच्या भेटीवर येत आहेत. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सलमा अन्सारी असतील. उपराष्ट्रपती २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारवारला निघतील. कारावारात युद्ध नौकेचे जलावतरण करून ते दुपारी ३ वाजता खास विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील.
दरम्यान, बैठकीस माहिती संचालक अरविंद बुगडे, पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई (दक्षिण) वामन तारी (सुरक्षा) आणि शिष्टाचार आदी उपस्थित होते.