युतीप्रश्‍नी भाजपची शिवसेनेला मुदत

0
87

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर काल भाजपने शिवसेनेला मुदत दिली. मागितल्या तेवढ्या जागा द्या किंवा युती संपुष्टात आणण्याबाबत तयार रहा, अशी तंबी भाजपने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १३५ जागा मिळाव्यात अशी भाजपची मागणी आहे. मात्र शिवसेनेही ही मागणी धुडकावून लावली आहे. दरम्यान, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौर्‍यावर आले असून ते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.