उत्तराखंड दुर्घटनेतील १७० जण अद्यापही बेपत्ता

0
87

>> ३५ मृतदेह सापडले

उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात तपोवन बोगद्यात मदतकार्य सुरू असतानाच काल गुरूवारी अचानक धौलीगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३५ मृतदेह हाती लागल असून जवळपास १७० जण अजूनही बेपत्ता आहेत. हाती लागलेल्या मृतदेहांचे डीएनए सॅम्पल सुरक्षित ठेवले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काल धौलीगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली लक्षात येताच बचावकार्यात गुंतलेल्या जवानांनी बाहेर काढण्यात आले. तसेच सर्व बचावकार्यासाठी वापरेलेली साधनेही बाहेर काढली. काही वेळाने पाणी ओसरले. त्यामुळे पुन्हा युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.

दुर्घटनेमुळे संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत पोहोचण्यासाठी आयटीबीपी जवानांनी एक तात्पुरता झुलता पूल तयार केला आहे. तपोवन बोगद्याशिवाय रेणी गावात आणि श्रीनगर धरणामध्येही शोधकार्य सुरू आहे. गावकर्‍यांकडून माहिती घेत त्यांच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. रविवार दि. ७ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती.