कोरोना लसीकरणानंतर सीएए ः अमित शहा

0
78

सध्या सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार आहे असे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत निर्वासितांना नागरिकत्व दिले जाणार असल्याचे यावेळी शहा म्हणाले. गृहमंत्र्यांनी, आयुषमान योजना लागू केली जाणार असल्याचे सांगत शेतकर्‍यांना वार्षिक थकबाकीव्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल. तसेच ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार असल्याचे शहा म्हणाले.