Home बातम्या इस्रायल-इराणचे हल्ले सुरुच

इस्रायल-इराणचे हल्ले सुरुच

0

पश्चिम आशियताील तणाव शिगेला पोहोचला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणवर जबरदस्त बॉम्बहल्ले केले. इराणच्या नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांसंदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होण्यापूर्वीच इस्त्रायलने हे हल्ले केले. तसेच इराणने देखील इस्रायलवर क्षेपणास्त्रांची 83वी खेप डागली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक पाऊल मागे घेतले आहे. पुढील 10 दिवस इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या विनंतीवरून हा निर्णय घेतल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तेहरानमधील हल्ल्यांदरम्यान लेबनॉनची राजधानी बैरूतच्या आकाशातही धुराचे लोट दिसले. मात्र, यासंदर्भात इस्रायलने अधिकृत पुष्टी केलेली नाही.
इराणकडून येणारी क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी इस्त्रायली सैन्य सज्ज असून संपूर्ण देशात हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. याशिवाय, इराणनेही आखाती शेजारी देशांवरील हल्ले सुरूच ठेवल्याने त्या ठिकाणी नुकसान झाले.