Home बातम्या चोडणकरांच्या याचिकेवरसोमवारी होणार सुनावणी

चोडणकरांच्या याचिकेवरसोमवारी होणार सुनावणी

0

काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सोमवार दि. 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेत गोवा विधानसभेचे सभापती, काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस, डिलायला लोबो, केदार नाईक यांना प्रतिवादी केले आहे.