उद्या शपथविधी, मोदी उपस्थित राहणार
आसामच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्या मंगळवारी दि. 12 रोजी हिमंता बिस्वा सरमा हे शपथ घेतील. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. जे. पी. नड्डा यांनी हिंमता सरमा यांच्या नावाची घोषणा केली. हिंमत सरमा हे 12 मे रोजी सकाळी 11 वाजता सलग दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दि. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार, भाजपने राज्यातील 126 पैकी 82 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व आणि एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
आसाम भाजपचे अध्यक्ष दिलीप सैकिया म्हणाले, 12 तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. हा एक ऐतिहासिक क्षण असेल, कारण पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत हिमंता 102 आमदारांसोबत शपथ घेतील.