आयपीएलमधून हेझलवूडची माघार

0
150

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी मोसम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्जचा जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड याने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे काल गुरुवारी जाहीर केले.

यावर्षी प्रतिष्ठेची ऍशेस मालिका आणि टी-ट्वेंटी वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहता यावे म्हणून हेझलवूडने आगामी आयपीएल मोसमात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपली अनुपलब्धता सीएसकेला कळवली आहे. आता त्याची जागा घेण्यासाठी सीएसके इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचा संघात समावेश करण्याची दाट शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घेणारा हेझलवूड हा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. याआधी फलंदाज जॉश फिलिपे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) आणि अष्टपैलू मिचेल मार्श (सनरायझर्स हैदराबाद) यांनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

आयपीएल स्पर्धेचा मागील मोसम यूएईमध्ये झाला होता. ३० वर्षीय हेझलवूडने या स्पर्धेत केवळ तीन सामने खेळले होते आणि त्याला केवळ एक विकेट घेता आली होती. त्यामुळे हेझलवूडच्या अनुपस्थितीचा चेन्नई संघावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. आता हेझलवूडच्या अनुपस्थितीत सीएसकेकडे ड्वेन ब्राव्हो, सॅम करन आणि लुंगी एन्गिडी या परदेशी वेगवान गोलंदाजांचा पर्याय आहे.