आमदार अपात्रता याचिका २६ रोेजी निकाली काढणार

0
193

>> सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची माहिती

गोवा विधानसभेच्या सभापतींकडून आमदार अपात्रता प्रकरणातील याचिका येत्या २६ फेब्रुवारी २०२१ रोजी निकालात काढली जाणार आहे, अशी माहिती सभापतींचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात काल दिली.

सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका लवकर निकालात काढण्यासाठी गोवा विधानसभेच्या सभापतींना निर्देश देण्याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली. सभापतींनी येत्या २६ फेब्रुवारीला सुनावणी ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अपात्रता याचिका तहकूब करावी, असा युक्तिवाद सभापतीचे वकील मेहता यांनी केला.
सभापतींकडून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे सभापतींना २६ फेब्रुवारीला याचिकेवर अंतिम निर्णय घेण्याची सूचना करावी, असा युक्तिवाद गिरीश चोडणकर यांच्या वकिलांनी केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. या प्रकरणी पुढील सुनावणी मार्च २०२१ च्या पहिल्या आठवड्यात घेतली जाणार आहे.