Home बातम्या आज, उद्या राज्यातउष्म्याचा दाह वाढणार

आज, उद्या राज्यातउष्म्याचा दाह वाढणार

0

भारतीय हवामान खात्याने दि. 15 एप्रिल आणि दि. 16 एप्रिल असे दोन दिवस राज्यात उष्णता व आर्द्रता वाढणार असल्याने यलो अलर्ट जारी केला आहे. वरील दोन्ही दिवस उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होण्याची शक्यता असून, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी व वरील दोन्ही दिवस दुपारच्या वेळेस बाहेर जाणे शक्यतो टाळावे. उष्णतेबरोबर आर्द्रताही वाढणार असल्याने लोकांनी बाहेर जाताना काळजी घ्यावी. तसेच आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे.