आजपासून १६ हजार लिटर मोफत पाणी

0
48

>> मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

>> पाण्याची बचत करण्याचे आवाहन

नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी आपण गोमंतकीयांना मोफत १६ हजार लिटर पाणी देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार उद्या दि. १ सप्टेंबर रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल दि. ३१ ऑगस्ट रोजी फेसबूक लाईव्हद्वारे गोमंतकीय जनतेशी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी, गोवा सरकारच्या मोफत पाणी योजनेसाठी पाण्याची बचत करा या योजनेचा उद्या दि. १ सप्टेंबरपासून शुभारंभ करण्यात येणार असल्याचीही माहिती दिली.

स्वतंत्र घरांत राहणार्‍या लोकांबरोबरच निवासी संकुलातील सदनिकांमध्ये राहणार्‍या लोकांनाही ह्या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अशा संकुलात सर्व सदनिकांना पाणीपुरवठ्यासाठीचा मीटर एकच असल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे कुणी समजू नये असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मोफत पाण्यासाठी पाण्याची बचत करा असा संदेश आम्ही या योजनेद्वारे दिलेला असल्याने त्याचा पाण्याची बचत होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच या बचतीमुळे जास्तीत जास्त लोकांना पाणी मिळण्यास मदत होणार असल्याचेही पुढे मुख्यमंत्री म्हणाले.

अशा प्रकारे राज्यभरातील लोकांना मोफत पाणीपुरवठा करणारे गोवा हे देशातील पहिलेच राज्य ठरणार असल्याचीही माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

पाण्याची बचत करा

या योजनेखाली राज्यातील दर एका कुटुंबाला मासिक १६ हजार लिटर पाणी मोफत मिळणार आहे. ह्या योजनेमुळे ग्राहकांना पाणी मोफत तर मिळेलच परंतु त्याचबरोबर पाण्याच्या मीटरसाठीचे शुल्कही भरावे लागणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मोफत पाण्यासाठी पाण्याची बचत करा असा संदेश आम्ही दिलेला असल्यामुळे त्याचा फायदा पाण्याचा तुटवडा नाहीसा होण्यासही मदत होणार असल्याचे पुढे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या लोकांनी यापूर्वीची पाण्याची बिले फेडलेली नाहीत त्यांना ती फेडता यावीत यासाठीची एकरकमी योजना आणखी दोन महिने वाढवण्यात आली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.