आगोेंदमधील अपघातात दोन विदेशी ठार

0
99

आगोंद येथील एका धोकादायक वळणावर काल संध्याकाळी चारच्या सुमारास एक टिपर ट्रक व इनफिल्ड मोटरसायकल यांची समोरासमोर टक्कर होऊन दोन विदेशी नागरिक जागीच ठार झाले. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेती भरलेला टिपर ट्रक क्रमांक जीए-०९ टी-५४८५ आगोंदच्या दिशेने जात असताना समोरून येणार्‍या मोटरसायकलने धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली एक तर दुसरा मागच्या चाकाखाली एकटा सापडला. अपघातात सापडलेली एक युवती असून दुसरा युवक आहे. त्यांच्या मागून येणारा आणखी एक परदेशी नागरिक त्याच ठिकाणी अपघातात सापडून जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी मडगावच्या हॉसिपिसिओ इस्पितळात पाठविण्यात आले. काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी मडगाव हॉसिपिसिओ इस्पितळात पाठवून दिले.