आंध्र प्रदेशात बस-ट्रक अपघातात १४ जण ठार

0
183

रविवारी पहाटे आंध्र प्रदेशमधील कुर्नूल येथे बस व ट्रकमधील भीषण अपघातात १४ जण ठार झाले तर ४ जण गंभीर जखमी झाले. ही घटना कुर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती भागातील मदारपूर गावात घडली. हा अपघात पहाटे ४ च्या सुमारास घडला.
ठार झालेल्यांमध्ये ८ महिला, ५ पुरुष आणि १ मुलाचा समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे. हे सर्वजण तीर्थयात्रेवर होते. चालकाचा मिनी बसवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला जाऊन धडकून रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने येणार्‍या ट्रकला धडकली. सर्व जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिनी बसमध्ये एकूण १८ प्रवासी होते. या अपघातातून ४ मुले वाचली आहेत. पण त्यातील दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे.