आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली

0
88

नागरी उड्डाण संचालनालयाने कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंदीत वाढ केली आहे. काल शुक्रवारी जारी केलेल्या एका आदेशाद्वारे ही बंदी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत लागू राहील. परंतु ही बंदी सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो व डीसीजीने मंजूर केलेल्या विमानावर लागू होणार नाही.

यापूर्वी ही बंदी ३१ जुलैपर्यंत लागू करण्यात आली होती. परंतु आता नवीन जारी केलेल्या आदेशानुसार त्यात वाढ केली आहे. वंदे मातरम अभियान आणि ठरावीक देशांत द्विपक्षीय एअर बबल अंतर्गत विशेष विमानांना उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली आहे.