जम्मू आणि काश्मीरमध्ये एकाचवेळी दिसले तीन द्रोन

0
76

जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात गुरुवारी रात्री वेगवेगळ्या ठिकाणी संशयास्पद पाकिस्तानी द्रोन उडताना दिसून आले. गुरुवारी रात्री साडेआठ ते साडेऊनच्या सुमारास एकाचवेळी तीन ठिकाणी हे द्रोन दिसले. यापैकी दोन द्रोन लष्करी छावणीजवळ तर एक इंडियो तिबेटीयन पोलीस म्हणजेच आयटीबीपीच्या छावणीजवळ दिसून आला.

सुरक्षादलाच्या जवानांनी या द्रोनवर गोळीबार केल्यानंतर हे द्रोन तेथून निघून गेले. एका आठवड्यापूर्वी कनचक परिसरामध्ये पोलिसांनी एक द्रोन पाडले होते. त्यात स्फोट घडवून आणणारे पाच किलो आयईडी सामान होते व ते द्रोन पाकिस्तानी होते.