आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक

0
87
अटक केलेल्या तिघा चोरट्यांसमवेत (बसलेले) पोलीस.

कुपे, नुवे येथे गेल्या दि. १३ रोजी राज गोम्स व इजाबॅला गोम्स यांच्यावर प्राणघातक हल्ला करून घरातील जडजवाहीर व रोख ४ हजार रुपये पळविण्याच्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या घरफोड्या विरोधी पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील तिघाजणांना अटक केली.अटक केलेल्यांमध्ये अनील भोई (बेळगाव), राहूल ज्योतीबा जाधव (कंग्राळी बेळगाव) व महमद सद्दिकी उत्तरप्रदेश) यांचा समावेश असून पैकी अनील हा सडा-वास्को येथील तुरुंगात होता. तो तेथूनच सर्व सूत्रे हलवित होता. त्याचा तुरुंगातील भ्रमणध्वनीही ताब्यात घेतला आहे. आणखी किमान ५ जण या टोळीत असून त्यांचाही शोध घेण्याचे काम चालू असल्याचे गर्ग यांनी सांगितले.
तुरुंग महानिरीक्षकांनाही वरील प्रकाराची कल्पना देऊन त्यांना वेळोवेळी तुरुंगाची तपासणी करण्यास सांगितले आहे, असे गर्ग यांनी सांगितले.