कुचेलीतील अपघातात युवक जागीच ठार

0
107

काल पहाटे साडेचारच्या सुमारास दुचाकी व रिक्षा यांच्यात शेळपे-कुचेली येथे गॅलॅक्सी इस्पितळाजवळ झालेल्या अपघातात मारियो पीटर लॉयला (२५) हा युवक जागीच ठार झाला. मारियो हा आपल्या जीए ०३ एन ११२९ या दुचाकीने म्हापशाहून कुचेली येथे घरी जात होता. त्याच्यासोबत हीना ही त्याची मैत्रीण बसली होती. शेळपे कुचेली येथे इस्पितळाजवळ पोहोचताच म्हापशाला जाणार्‍या जीए ०३ क्यू २०१२ या रिक्षाची जोरदार धडक सदर दुचाकीला बसली. त्यात मारियो हा रस्त्यावर फेकला गेला व तो जागीच ठार झाला. तर हीना ही जखमी झाली. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवला असून हीनावर उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी रिक्षाचालक लक्ष्मण विठ्ठल नार्वेकर ऊर्फ लोखंड, जोसेफवाडा कुचेली याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.