बांदोड्यातील तरुणीची प्रेमसंबंधातून आत्महत्या

0
92

प्रिया संजय गावकर (वय २४) या युवतीने परशुरामनगर बांदोडा येथील आपल्या राहत्या घरात दुपट्ट्याचा गळफास लावून आत्महत्या केली. घरात ती एकटीच राहत होती. कपीलेश्‍वरी-फोंडा येथे राहणार्‍या एका युवकाकडे प्रियाचे प्रेम संबंध जुळले होते, हे उघड झाले आहे. गुरुवारी यांच्यात भांडण झाले. अखेर काही जणांनी प्रियाची विवाहित बहिण व भावोजी (राहणार शिवोली) यांना बोलावून घेतले. नंतर त्यांच्यात बोलणी होऊन भांडण मिटवण्यात आले. दोघांचे लवकरच लग्न करण्याचेही ठरले. ती दोघे आपल्या घरी निघून गेली. त्यानंतर ही थदुर्दैवी घटना घडली. पोलीस उपनिरीक्षक हरिष वायंगणकर यांनी पंचनामा केला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, बोतोडा फोंडा येथील चोरी प्रकरणी रवी लमाणी (२६) लोकप्पा लमाणी (२६), नागझर कुर्टी व कृष्णा चव्हाण (३४) बाजारमळ कुर्टी या तिघांना गस्तीवरील पोलीस पथकाने अटक केली. आस्थापनात चोरलेले पंख्याची ब्लेडस् व अन्य सामान व एक दुचाकी रस्त्यावर टाकून दिलेली दुचाकी पोलिसाना सापडली. तीनही संशयिताना येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे करून सखोल चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड घेतला. फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.