आम आदमी पार्टीवाले अराजक माजवू पाहताहेत व व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहताहेत असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते तथा परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी काल केला. आम आदमी पार्टीचे देशभरातील सदस्य हे सगळे तिसर्या दर्जाचे लोक आहेत असेही ते म्हणाले.
आम आदमी पार्टीपासून देशाच्या व्यवस्थेला धोका असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत ङ्गआपफ कुठेही शर्यतीत नसून तसे त्यांना वाटत असेल तर ती एक चूक असल्याचे खुर्शीद यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.ङ्घआपफचा सगळाच स्वर नकारात्मक आहे, काळाच्या कसोटीवर उतरलेलेही त्यांना वाईट वाटते, ते म्हणाले.