अभिनेत्री भारती सिंगसह हर्ष लिंबाचियाला कोठडी

0
101

>> अमलीपदार्थ प्रकरण

अमलीपदार्थ प्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. भारती आणि हर्ष यांच्यावर अमलीपदार्थ सेवन केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या किल्ला न्यायालयात भारती सिंग आणि हर्ष लिम्बाचिया यांना सादर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

कॉमेडियन भारती सिंगचा पती हर्षला देखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. . ड्रग्स पेडलर्सकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंहच्या घरी एनसीबीने छापा टाकला होता. छाप्यात त्यांचा घरात आणि कार्यालयात ८६.५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. शिवाय गांजाचे सेवन करत असल्याची कबुली दोघांनी अटकेनंतर चौकशीवेळी दिली होती.