राज्यात कोरोनाचे गेल्या २४ तासांत ७८ नवे रुग्ण

0
90

>> आणखी दोघा जणांचा मृत्यू

कोरोनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून कमी कमी होताना दिसत असून काल राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले केवळ ७८ नवे रुग्ण सापडले. तर कोरोनाची बाधा झालेल्या दोघांचा मृत्यू झाला.

सध्या राज्यात ऍक्टिव कोविड रुग्णांची संख्या ही ११७० एवढी आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६८२६ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू पडलेल्यांची संख्या ६७७ एवढी आहे. तर कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ४४९७९ एवढी आहे. गेल्या २४ तासात कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १६७ एवढी आहे.

आतापर्यंत गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारलेल्या रुग्णांची संख्या २३८१९ एवढी आहे. आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ही १३००७ एवढी आहे. राज्यात कोरोनासाठीची चाचणी केलेल्यांची संख्या ही ३३२७३८ एवढी आहे.