अफगाणिस्तानात १७२ दहशतवाद्यांचा खात्मा

0
50

अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी केलेल्या गेल्या दोन दिवसांत केलेल्या कारवाईत १७२ तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. तालिबानच्या विरोधात अफगाण राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाने विशेष मोहीम राबवली होती. या कारवाईत १७२ तालिबानी अतिरेकी ठार झाले. तर, १०० हून अधिक जखमी झाले आहेत. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिबान दहशतवाद्यांचा कमांडर कारी रहमतुल्लाहचाही समावेश आहे. काही गावे तालिबान दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यात आली आहेत. तसेच या दरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. त्याशिवाय अनेक शक्तिशाली स्फोटकेही निष्क्रिय करण्यात आली.