अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर अध्यक्ष

0
199

नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेजमध्ये काल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत सुरूवातीला भारत सासणे यांच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र ज्येष्ठ साहित्यिक जयंत नारळीकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर एकमताने नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नारळीकर यांची ज्येष्ठता व साहित्यमूल्य लक्षात घेता त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. यावेळी तारा भवाळकर, ना. धों. महानोर, अनिल अवचट, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे यांच्या नावांचीही चर्चा झाली.