दाबोळी विमानतळावर ९३ लाखांचे सोने जप्त

0
189

दाबोळी विमानतळावर गोवा जकात विभागाने केलेल्या कारवाईत २ किलो १७० ग्रॅम वजनाचे तस्करीचे सोने जप्त केले. याची किंमत ९५ लाख ३ हजार रुपये होते. नवी दिल्लीहून विमानाने आलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली. हे सोने प्रवाशाने प्रवासी खुर्चीखाली लपवून ठेवले होते. शनिवारी रात्री उशिरा केलेल्या या कारवाईत नवी दिल्लीहून विस्तारा (युके ८४७) या विमानातून प्रवासी तस्करीचे सोने आणणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्‍यांना पूर्वीच प्राप्त झाली होती. त्यानुसार दाबोळी विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी पाळत ठेवत ही कारवाई केली. सदर प्रवाशाविषयी अधिकार्‍यांना संशय आला व त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे २ किलो १७० गॅ्रम वजनाची विदेशी सोन्याची बिस्किटे आढळली.