अकरावी विज्ञान, डिप्लोमासाठी आज व उद्या प्रात्यक्षिक परीक्षा

0
54

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अकरावी विज्ञान, डिप्लोमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा (मॉकड्रील) २ व ३ जुलै २०२१ रोजी घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अकरावी विज्ञान आणि डिप्लोमा प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या वेळी येणार्‍या अडीअडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. प्राथमिक टप्प्यात राज्यातील सहा तालुक्यांत प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावीचा निकाल येत्या १३ जुलै रोजी जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विद्यालय व्यवस्थापनाने धोरणानुसार गुणांची माहिती मंडळाकडे सादर केली आहे. ज्यांना निकाल आवडणार नाही. त्यांच्यासाठी नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर मिळणारा नवीन निकाल परीक्षेला बसणार्‍यांना मान्य करावा लागणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.