चोवीस तासांत राज्यात ६ मृत्यू, २३१ कोरोनाबाधित

0
48

राज्यात चोवीस तासांत नवे २३१ रुग्ण आढळून आले असून आणखी ६ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. सध्याच्या कोरोना रुग्णसंख्या २२७८ एवढी असून बळींची एकूण संख्या ३०६० एवढी झाली आहे.

राज्यात जून महिन्यापासून नवीन कोरोना रुग्ण आणि कोरोना बळींच्या संख्येत चढउतार सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५.२८ टक्के एवढे आहे.

इस्पितळांतून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ९२० एवढी झाली आहे.
चोवीस तासांत ४३७२ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २३१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

मडगाव, पणजी , कांदोळी, पर्वरी, फोेंडा, कुठ्ठाळी, वास्को, कासावली, पेडणे, साखळी, काणकोण या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनाबाधित नव्या १९ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.

मडगाव येथे सर्वाधिक १४२ रुग्ण आहेत. फोंडा येथे १३२ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १०२ रुग्ण, साखळी येथे १११ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील रुग्ण संख्या शंभरपेक्षा कमी आहे.
नवीन २१२ जणांनी होमआयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील आणखी २२१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बर्‍या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५१ हजार ५८२ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८० टक्के एवढे आहे.