Home बातम्या सरकारी कार्निव्हल व शिमगा यंदा होणे कठीण

सरकारी कार्निव्हल व शिमगा यंदा होणे कठीण

0

गोवा विधानसभेसाठीची आचारसंहिता लागू झालेली असल्याने यंदा सरकारला राज्यात कार्निव्हल व शिमगोत्सवाचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोग कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारतर्फे दरवर्षी राज्यात कार्निव्हल व शिमगोत्सव आयोजन करण्यात येते. या महोत्सवासाठी राज्य सरकार लाखो रु. खर्च करते. मात्र, यंदा राज्यात विधानसभा निवडणुका असल्याने राज्य सरकारला कार्निव्हल व शिमगोत्सवातील कोणताही निधी वितरित करता येणार नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला कार्निव्हल अथवा शिमगोत्सवात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे यंदा राज्यात सरकारी कार्निव्हल अथवा शिमगोत्सव होणे कठीणच असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, असे असले जरी काल पणजी महापालिकेने महापौर यतिन पारेख यांच्या अध्यक्षतेखाली कार्निव्हल आयोजन समितीची निवड केली. ही समिती अशी आहे – चेअरमन यतीन पारेख, अध्यक्ष फ्रान्सिस्को मार्टिन्स, उपाध्यक्ष मिलिंद शिरोडकर, बेंटो क्लोरेना, पास्कोला मास्कारेन्हस, नालास्को पेरेरा, मेसियस तावारीस, सचिव – कारोलिना पो, संयुक्त सचिव – मार्गारिटा कुयेल्हो, कोषाध्यक्ष – एडी जॉर्ज, संयुक्त कोषाध्यक्ष ऍना रोझ डिसोझा, मारिया रिटा फर्नांडिस.

आयोजन समिती – कबीर पिंटो मखिजा, सिझर डिमेलो, प्रज्योत वायंगणकर, नाझारेथ काब्राल, ऍडी नोरोन्हा. सदस्य – विव्हिना नास्नोडकर, गंगाराम काळे, प्रियेश वळवईकर, पीटर रिबेलो, हुर्क्युलानो रिबेरो, मायकल रिबेरो, पीटर फर्नांडिस, समीर पै रायकर व लुइगी फेर्रांव, सल्लागार टोनी डायस व टोनी रॉड्रिग्ज. दरम्यान, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झालेली असल्याने यंदा सरकारला कार्निव्हल व शिमगोत्सवाचे आयोजन करता येणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले असताना वरील दोन्ही उत्सव हे राज्याचे उत्सव असल्याने व दरवर्षी ते होत असल्याने या उत्सवांना निवडणूक आचारसंहिता लागू होईल असे वाटत नसल्याचे पणजीचे महापौर व यंदाच्या कार्निव्हल समितीचे चेअरमन यतिन पारेख यांनी काल प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.