Home बातम्या श्रीपाद यांच्या उमेदवारीबाबत चार-पाच दिवसांत निर्णय

श्रीपाद यांच्या उमेदवारीबाबत चार-पाच दिवसांत निर्णय

0

मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारीच्या बाबतीत झुलवत न ठेवता स्पष्ट ते सांगा, असे नाईक यांनी राष्ट्रीय नेतृत्वाला सांगितल्याचे कळते. पर्वरी मतदारसंघाची उमेदवारी नाईक यांनाच देण्यात यावी म्हणून त्यांच्या समर्थकांनी भाजप नेतृत्वावर दबाव आणला आहे. वरील प्रकारामुळे पक्षात खळबळ निर्माण झाली असून नाईक यांनी राज्याच्या राजकारणात येऊ नये, असे वाटणार्‍या काही स्थानिक नेत्यांनी नुकतीच मुंबईत जाऊन राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केल्याचे कळते.

उमेदवारीच्या बाबतीत पक्षश्रेष्ठींकडून कोणता आदेश येतो याची नाईक सध्या प्रतीक्षा करीत आहे. पर्वरी मतदारसंघासाठी गोविंद पर्वतकर यांचे नाव आहे. परंतु ते श्रीपाद नाईक यांचे समर्थक असल्याने त्यांनी यापूर्वीच आपण इच्छुक नसल्याचे भाजप नेत्यांना सांगितले होते.

केंद्रीय नेत्यांनी मान्यता दिल्यास निवडणूक लढवणार : श्रीपाद

पर्वरी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून मागणी सुरू केली होती, आपण तरीही तयार नव्हतो. मात्र आता कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला असल्याने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे असे खासदार श्रीपाद नाईक यांनी सांगितले. मात्र केंद्रीय नेत्यांनी मान्यता दिल्यासच तसे करू असे ते म्हणाले.

शेगाव येथील गजानन महाराज पालखी काल मडगाव येथे पोचल्यावर श्री. नाईक यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीही उपस्थिती होती.