24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

लहान मुलांना वाफ देताना…

 • डॉ. विशाल सावंत (बालरोग सर्जन)
 • डॉ. सुमंत प्रभुदेसाई (बालरोग तज्ज्ञ)- हेल्थ-वे हॉस्पिटल

सर्दी, रक्तसंचय आणि श्वसन संसर्गाचा सामान्य उपाय म्हणून स्टीम इनहेलेशन, कोविड आणि श्वसन आजारांना दूर ठेवण्याच्या प्रयत्नात घरातील सामान्य दैनंदिन प्रथा बनली आहे. तथापि मुलांसाठी योग्यरीत्या न केल्यास चटके बसतात किंवा भाजू शकते.
अवेळी पावसामुळे तापमानात चढउतार आणि कोविड-१९ विषाणूची लागण होण्याची भीती पालकांना लहान मुलांना वाफारा देण्यास प्रोत्साहित करते. मुलं अतिसंवेदनशील असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते.
वाफ देण्याच्या प्रयत्नात गरम पाण्यामुळे जळल्याच्या मुलांच्या घटनांमध्ये चौपटीने वाढ झाली आहे. वाफेच्या दरम्यान गरम पाणी अंगावर उडाल्याने भाजल्याची लक्षणे असणारी ८ ते १० मुले सध्या असतात.
म्हणून असेही सांगावेसे वाटते की दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी श्वसन आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून वाफ घेण्याचे टाळले पाहिजे.
चटके, भाजणे किंवा जाळ यांच्यामुळे झालेल्या जखमा या वाफ घेण्याच्या संभाव्य फायद्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक आहेत.
केवळ नाक ब्लॉक, वाहणारे नाक किंवा ऍलर्जी असणारी मुलेच आवश्यक ती काळजी घेताना बालरोगतज्ज्ञांनी सल्ला दिल्याप्रमाणे वाफ घेऊ शकतात.

 • मुलांची त्वचा ही अधिक नाजूक व संवेदनशील असल्याने जळण्याचा परिणाम तीव्र होऊ शकतो. दहा टक्क्यांपेक्षा जास्त ज्वलन झाल्यास किंवा त्यांचा चेहरा, हात, पाय किंवा जननेंद्रियांसारख्या संवेदनशील भागाचा समावेश असल्यास मुलाला तातडीने जवळच्या डॉक्टरकडे नेणे आवश्यक आहे. एखादे वेळेस मुलाला दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते. द्रव पदार्थाचे नुकसान झाल्यास, तीव्र जळजळीच्या पृष्ठभागावर किंवा दुय्यम संसर्गास रोखण्यासाठी सतत क्लिनिकल निरीक्षणाची आवश्यकता असते.
  तसेही जाळपोळची घटना घडल्यास प्रथम मुलाला त्वरित जळण्याच्या स्रोतापासून दूर नेऊन बाधित भागावर साधे पाणी घाला. बाधित भागाला थंड नळाच्या पाण्याखाली ठेवणे चांगले.
 • दूथपेस्ट, ग्रीस, कॉस्मेटिक आणि औषधी क्रीम यांसारख्या पदार्थांचा वापर करणे, विशेषतः फोड किंवा त्वचेचे नुकसान होण्याच्या बाबतीत सूचविले जात नाही कारण त्यामुळे जखमेची काळजी घेण्याच अडथळा येऊ शकतो.
 • जर मुलाला वेदना तीव्र स्वरुपाची असेल तर पॅरासिटामॉल सिरप मुलाची वेदना कमी करू शकते.
 • उष्णता किंवा गरम द्रव शरीरावर पडल्यास फोड येणे हा नैसर्गिक प्रतिसाद आहे. जळणे किंवा भाजणे सहसा मुलांमध्ये कोणताही डाग किंवा घाव न ठेवता बरे होतात.
  वाफ देण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही मुलांना चटके लागतात किंवा भाजू शकते. त्यासाठी…
 • स्टीमर मुलाला सोयीच्या उंचीवर मुलाच्या जवळ ठेवा. स्टीमर बघून वाफ घ्या. व्यावसायिक इलेक्ट्रिक स्टीमर वापरा कारण त्यात पाण्याचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे पाणी सांडण्याचा धोका कमी असतो आणि त्यामुळे मुलांकरिता वापरण्यास सोयीचे ठरते.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

शेतकर्‍यांसोबत दहावी चर्चा निष्फळ

>> केंद्राचा कायदे रद्द करण्यास नकार, शेतकरी ठाम केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेले ५५ दिवस आंदोलन सुरू आहे....

जम्मूमध्ये एलओसीवर ३ अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या जम्मू जिल्ह्यात एलओसीवर भारतीय जवानांनी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यावेळी झालेल्या चकमकीत चार जवानदेखील जखमी झाले...

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

ALSO IN THIS SECTION

धान्यवर्ग

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) जिथे जे पिकते ते खावे, या न्यायाने संपूर्ण कोकणवासीय भात खाऊ शकतात.तांदळाच्या वरच्या कोंड्यात...

बायोस्कोप – ३ कोकोच शत्रू कोकोचा

प्रा. रमेश सप्रे तुझा सर्वांत चांगला मित्र (हितचिंतक) तू स्वतःच आहेस आणि तुझा सगळ्यात वाईट शत्रू (हितशत्रू)ही तूच...

तेथे कर माझे जुळती!

योगसाधना - ४९०अंतरंग योग - ७५ डॉ. सीताकांत घाणेकर ...

कोरोना लस पूर्वचाचणी

मंजुषा पराग केळकर माझे नातेवाईक, मित्रमैत्रिणी ह्यांनी खूप कौतुक केले व खूप शाबासकी दिली, धीर दिला. वेळोवेळी फोनवरुन...

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...