एदुआर्द फालेरो यांच्यावरील पुस्तकाचे मांडवी हॉटेलमध्ये प्रकाशन होणार असल्याचे व या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दिगंबर कामत, क्रीडामंत्री बाबू आजगावकर, स्वतः एदुआर्द फालेरो व केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अजय माकन हे येणार असल्याचे वृत्त मिळताच भाषा सुरक्षा मंच व भाजपच्या कार्यकर्त्यांनी मांडवी हॉटेलसमोर गर्दी केली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत, बाबू आजगावकर, एदुआर्द फालेरो यांना यावेळी वरील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्यानंतर पणजी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
४.१५ वा. ताब्यात घेतलेल्या या कार्यकर्त्यांना नंतर ६.३० वा. मुक्त करण्यात आले. मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवणार्यांमध्ये माजी महापौर अशोक नाईक, राजदीप नाईक, पुंडलिक राऊत देसाई, वैदेही नाईक, शुभम चोडणकर, शीतल नाईक, शुभा धोंड, दीपक म्हापसेकर, विष्णू नाईक आदींचा समावेश होता.