Home बातम्या मिरामार हल्लाप्रकरणी पाचजणांना आंबोलीत अटक

मिरामार हल्लाप्रकरणी पाचजणांना आंबोलीत अटक

0

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे यतीन विश्‍वनाथ तिगाडे (२१), अश्रफ महम्मद शेख (१८), संदीप चक्रवर्ती शिंदे (२३), कृष्णा शिवाजी नाईक (२१) व गॉडपिन मारिओ मिस्किता (१८) (सर्व सांताक्रुझ) अशी नावे आहेत.

वरील आरोपी जीए ०१ सी १२३३ या मारुती ८०० गाडीने आंबोलीला गेले असता संशयास्पदरीत्या फिरताना त्यांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्याना आंबोली आऊट पोस्टवर नेण्यात आले. पणजी पोलिसांना यासंबंधीची माहिती मिळताच पोलिसानी आंबोली येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले.

गालू उर्फ साल्वादोर फर्नांडिस व यतीन तिगाडे यांचे यापूर्वी एकदा भांडण झाले होते. त्या मारामारीचा वचपा काढण्यासाठीच आपण हा हल्ला केल्याचे यतीन तिगाडे यांने पणजी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. यासंबंधी पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर हे पुढील तपास करीत आहेत.