Home बातम्या मडगाव येथे दिवसाढवळ्या १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास

मडगाव येथे दिवसाढवळ्या १ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास

0

पाजीफोंड येथे चोरट्यांनी घरात घुसून सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची तक्रार हरीश मकवाना यांनी मडगाव शहर पोलिस स्थानकात केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी घरात घुसून सोन्याच्या बांगड्या तसेच मंगळसूत्र मिळून सुमारे १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे दागिने पळवल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंतच्या दरम्यान वरील चोरीचे प्रकरण घडले. त्यावेळी मकवाना कुटुंबिय घरात नव्हते. कपाटाशेजारच्याच चाव्या वापरून चोरट्यांनी सोन्याचे दागिने पळवल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यानी दिली.